Join us  

BAN vs WI, 1st Test : वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय

Bangladesh vs West Indies, 1st Test : विरेंद्र सेहवागसह क्रिकेट विश्वातून होतंय वेस्ट इंडिजच्या खेळाडूचं कौतुक

By स्वदेश घाणेकर | Published: February 07, 2021 4:22 PM

Open in App

Bangladesh vs West Indies, 1st Test : चत्तोग्राम येथे खेळवण्यात आलेल्या बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यानं साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. पाहुण्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजानं दमदार खेळ केला आहे. वेस्ट इंडिजनं ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग करून मालिकेत आघाडी घेतली. पण, या सामन्यात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला तो पदार्पणवीर कायले मेयर्स ( Kyle Mayers)...  पदार्पणाच्या कसोटीत दुसऱ्या डावात द्विशतक झळकावाणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. याशिवाय त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली.

मॅच हायलाईट्स

- बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४३० धावांच्या उत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५९ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात बांगलादेशनं ८ बाद २२३ धावांवर डाव घोषित करून विंडीजसमोर ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले.  ३९५ धावांचा पाठलाग करताना विंडीजचे आघाडीचे तीन फलंदाज ५९ धावांवर माघारी परतल्यानंतर बांगलादेशच्या चमूत विजयाचा विश्वास निर्माण झाला. पण, कायले मेयर्स व एनक्रुमाह बोन्नेर यांनी सामना रोमहर्षक बनवला.   चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video

-  वेस्ट इंडिजनं ३९५ धावांचे लक्ष्य ३ विकेट्स राखून पार केले. मेयर्स ३१० चेंडूंत २० चौकार व ७ षटकार खेचून २१० धावांवर नाबार राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात दुसऱ्या डावात शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. याशिवाय आशियात अशी कामगिरी करणाराही तो पहिलाच खेळाडू आहे. पाहुणे जोमात, यजमान कोमात; कायले मेयर्सनं मोडला ६२ वर्षांपूर्वीचा भारतीय दिग्गजाचा विक्रम

-  धावांचा पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज आहे.  यापूर्वी १९८४मध्ये गॉर्डन ग्रिनीज यांनी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध नाबाद २१४ धावा केल्या होत्या. पदार्पणात द्विशतक झळकावणारा मेयर्स हा सहावा फलंदाज आहे.  Sad News : वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचे निधन; सायकल चालवत असताना कारनं दिली जोरात धडक

- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा धावांचा पाठलाग करणारी पाचवी सर्वोत्तम खेळी आहे. या विक्रमात, 418 - WI v Aus, St John's, 2003, 414 - SA v Aus, Perth, 2008, 404 - Aus v Eng, Leeds, 1948 व  403 - Ind v WI, PoS, 1976 हे आघाडीवर आहेत.  

-  मेयर्स व बोन्नेर यांनी २१६ धावांची भागीदारी केली. बोन्नेर ८६ धावांवर माघारी परतला. मेयर्स व बोन्नेर यांनी आशिया खंडात चौथ्या डावात वेस्ट इंडिजकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली.  यापूर्वी १९७५मध्ये बैचॅन व क्लाईव्ह लॉईड यांनी चौथ्या विकेटसाठी पाकिस्तानविरुद्ध १६४ धावा जोडल्या होत्या.

- चौथ्या डावात द्विशतक झळकावणारा कायले मेयर्स सहावा खेळाडू आहे. यापूर्वी जॉर्ज हेडली ( २२३ वि. इंग्लंड, १९२९/३०, ड्रॉ), बिल एडरिच ( २१९ वि. दक्षिण आफ्रिका, १९३८/३९, ड्रॉ), सुनील गावस्कर ( २२१ वि. इंग्लंड, १९७९, ड्रॉ), गॉर्डन ग्रिनिज ( २१४* वि. इंग्लंड, १९८४, विजय), नॅथल अॅस्टल ( २२२ वि. इंग्लंड, २००१-०२, पराजय) यांनी अशी कामगिरी केली आहे.   

टॅग्स :वेस्ट इंडिजबांगलादेश