Join us  

2020च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी 

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 3:25 PM

Open in App

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पुरुष व महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. पण, तत्पूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यासाठी वेस्ट इंडिज संघानं मंगळवारी आपला संघ जाहीर केला. 19 वर्षांखालील या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रथम संघ जाहीर करण्याचा मान वेस्ट इंडिजनं पटकावला.

17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. त्यात किमानी मेलिअस हा वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. 2018च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील तीन खेळाडू याही संघात दिसणार आहेत. त्यात कर्णधार मेलिअससह अष्टपैलू खेळाडू निईम यंग आणि गोलंदाज अशमीद नेड यांचा समावेश आहे. यंगनं 2018च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यानं 33 चेंडूंत नाबाद 55 धावा चोपल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या उदयोन्मुख खेळाडूंचा पुरस्कार पटकावणाऱ्या लिओनार्डो ज्युलियन आणि जायडेन सीर्लेस यांचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीचा अंदाज बांधताना विंडीजच्या चमूत पाच जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. 

वेस्ट इंडिजनं 2016मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. 2004मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर 1988, 2002 आणि 2010मध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

वेस्ट इंडिजचा संघ - केव्हलोन अँडरसन, डॅनिएल बेकफोर्ड, मॅथ्यू फोर्डे, जोशूआ जेम्स, नयीम यंग, अँटोनियो मॉरिस, अशमीड नेड, मॅबेकी जोसेफ, लिओनार्डो ज्युलियन, अविनाश महाबीरसिंग, किर्क मॅकेंझी, रामोन सिमोंड्स, मॅथ्यू पॅट्रीक, जयदेन सिलेस.

टॅग्स :आयसीसीवेस्ट इंडिज