Join us

वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरला हॉटेलबाहेरच लुटले; बंदुकीच्या धाकावर मोबाईल, बॅग लंपास

वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने एलेनला काहीही दुखापत झाली नसल्याचे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 22:53 IST

Open in App

वेस्ट इंडिजचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटर फॅबिअन एलेन याला धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. जोहान्सबर्गमध्ये त्याची साऊथ आफ्रिकन २० २० लीगची टीम उतरलेली त्या हॉटेलसमोर बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले आहे. 

SA20 लीगमध्ये तो यंदाच्या मोसमात पर्ल रॉयल्स संघाकडून खेळत आहे. जोहान्सबर्गच्या सँडटन सन हॉटेलसमोर एलेन असताना काही बंदुकधारी लुटारू आले. त्यांनी एलेनच्या डोक्याला बंदूक लावून त्याच्याकडील महागडा मोबाईल आणि त्याची बॅग हिसकाऊन घेतली व पलायन केले. या घटनेमुळे SA20 मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने एलेनला काहीही दुखापत झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी या लीगमध्ये खेळणाऱ्या आणखी एका खेळाडूशी संपर्क साधला आहे. पार्ल रॉयल्स व्यवस्थापनाने यावर काहीही भाष्य केलेले नाहीय. तर एसए२० च्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलीस तपास करत असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :वेस्ट इंडिजद. आफ्रिकाचोरी