Join us

अवघ्या ४३ धावांत वेस्ट इंडिजकडून बांगलादेशचा खुर्दा

केमार रोचनने फक्त आठ धावांमध्ये पाच बळी मिळवल्यामुळे वेस्ट इंडिने बांगलादेशचा फक्त ४३ धावांत खुर्दा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 21:43 IST

Open in App
ठळक मुद्देफक्त ३३ धावांमध्ये बांगलादेशचे १० फलंदाज धारातिर्थी पडले.

नवी दिल्ली : केमार रोचनने फक्त आठ धावांमध्ये पाच बळी मिळवल्यामुळे वेस्ट इंडिने बांगलादेशचा फक्त ४३ धावांत खुर्दा उडवला. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये अमेरिकमध्ये कसोटी सामने सुरु आहेत. या दोन्ही देशांतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशची प्रथम फलंदाजी होती. पण प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा पहिला डाव १८.४ षटकांमध्ये संपुष्टात आला.

बांगलादेशला १० धावांवर असताना पहिला धक्का बसला. त्यानंतर फक्त ३३ धावांमध्ये बांगलादेशचे १० फलंदाज धारातिर्थी पडले. बांगलादेशकडून सर्वाधिक २५ धावा लिटन दासने केल्या. पण बांगलादेशच्या १० फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. वेस्ट इंडिजकडून रोचने बांगलादेशचा अर्धा संघ गारद केला, तर मिग्युएल कमिन्स आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन आव दोन बळी मिळवले.

 

 

टॅग्स :क्रिकेटबांगलादेशवेस्ट इंडिज