"आम्ही रांगेत उभे राहणार नाही!" IPL तिकिटांवरून आमदार नाराज; प्रत्येकाला हवी VIP सीट, तेही…

आमदारांनी स्टेडियममध्ये कुटुंबासह सन्मानाने सामना पाहता यावा यासाठी स्वतंत्र लाउंजचीही मागणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:01 IST2026-03-27T12:57:27+5:302026-03-27T13:01:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
We Wont Stand In Line Like Common People Karnataka MLA Demand 4 VIP Tickets Before Rcb vs SRH Match Allege Black Marketing | "आम्ही रांगेत उभे राहणार नाही!" IPL तिकिटांवरून आमदार नाराज; प्रत्येकाला हवी VIP सीट, तेही…

"आम्ही रांगेत उभे राहणार नाही!" IPL तिकिटांवरून आमदार नाराज; प्रत्येकाला हवी VIP सीट, तेही…

Karnataka MLA Demand 4 VIP Tickets Before RCB vs SRH IPL 2026 Match  : IPL स्पर्धेतील सामन्यासाठीच्या तिकीटाच्या मुद्यावरून कर्नाटक विधानसभेत शुक्रवारी एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. आयपीएल सामन्यांचे तिकीट मिळत नसल्यामुळे आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर (U.T. Khader)  यांनी राज्य सरकारला  निर्देश देत सांगितले की, बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणाऱ्या प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी प्रत्येक आमदाराला किमान ४ व्हीआयपी तिकिटे मिळतील याची खात्री करावी.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आमदारांनी सर्व सामान्याप्रमाणे रांगेत उभे राहायचं का?

२८ मार्चला आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यापूर्वी आमदारांनी तिकिटांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसचे आमदार काशाप्पनवर विजयानंद शिवशंकरप्पा यांनी तक्रार करताना सांगितले की, “कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आमदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान देत नाही. सामना पाहण्यासाठी आम्हाला सर्वसामान्यांसारखे लांब रांगेत उभे राहायचे नाही. मागच्या वेळी आम्हाला अनेक तास प्रतीक्षा केल्यावर शेवटी जनरल गॅलरीत पाठवण्यात आले.” यावेळी आमदारांनी स्टेडियममध्ये कुटुंबासह सन्मानाने सामना पाहता यावा यासाठी स्वतंत्र लाउंजचीही मागणी केली आहे.

IPL Diaries : 'ती' एक अट महागात पडली! 'या' ग्लोबल स्टारचं IPL करिअर सुरु होण्याआधीच संपलं

तिकिटांच्या काळाबाजाराचे गंभीर आरोप

सभागृहात केवळ व्हीआयपी वागणुकीचा मुद्दाच नव्हे, तर तिकिटांच्या गैरव्यवहाराचाही विषय गाजला. आमदारांनी आरोप केला की, केएससीए सरकारकडून सुरक्षा आणि इतर सुविधा घेतो, पण जनप्रतिनिधींना योग्य सन्मान देत नाही. शिवशंकरप्पा यांनी दावा केला की,  ५,००० रुपायांचे तिकीट काळाबाजारात ३५,००० ला विकले जात आहे. ऑनलाइन विक्रीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आहेत.

कर्नाटक राज्.य सरकारची भूमिका 

विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की, आमदारांनी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी तिकिटे मागितली तर त्यात काहीही गैर नाही. या प्रकरणात हस्तक्षेप करत तातडीने केएससीए अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढू, असे त्यांनी सांगितले आहे.

 

Web Title : कर्नाटक विधायकों की आईपीएल टिकटों की मांग, लाइन में लगने पर आपत्ति

Web Summary : कर्नाटक के विधायकों ने वीआईपी आईपीएल टिकटों की कमी का विरोध किया। विधानसभा अध्यक्ष ने सरकार को यह सुनिश्चित करने का निर्देश दिया कि प्रत्येक विधायक को बैंगलोर मैचों के लिए चार वीआईपी टिकट मिले। विधायकों ने ब्लैक मार्केट में टिकटों की बिक्री पर भी चिंता जताई और अलग लाउंज की मांग की।

Web Title : Karnataka MLAs Demand VIP IPL Tickets, Object to Queueing

Web Summary : Karnataka MLAs protested the lack of VIP IPL tickets. The assembly speaker directed the government to ensure each MLA receives four VIP tickets for Bangalore matches. MLAs also raised concerns about black market ticket sales and demanded separate lounges.