Join us

प्ले- ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आम्ही चांगला खेळ केला आहे - कोहली

आम्हाला व्यवस्थापनाकडून प्ले ऑफच्या स्थितीबाबत कळविण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 14:41 IST

Open in App

अबू धाबी: दिल्ली कॅपिटल विरोधातील 6 गड्यांनी पराभवानंतरही रॉयल चॅलेंजर बंगलोर ने आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट विराट कोहली यांनी म्हटले की, या स्पर्धेत अव्वल चार मध्ये पोहोचण्यासाठी आम्ही आतापर्यंत पुरेसा चांगला खेळ केला आहे. या विजयानंतर दिल्लीला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत कारण ते गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. त र दुसर्‍या बाजूला आरसीबी 14 गुणांसह अव्वल चारमध्ये आहे.

विराट कोहली पुढे म्हणाला की, 'आम्हाला व्यवस्थापनाकडून प्ले- ऑफच्या स्थितीबाबत कळविण्यात आले होते. त्यामुळे आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी दोन सामने जिंकावे लागतील. हे दोन्ही सामने आणखी धैर्याने खेळून आमच्या आमच्या चांगल्या बाजूंचा सकारात्मक उपयोग करावा लागेल.'

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ने अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. त्याआधी आरसीबीचा देवदत्त पड्डीकल याचे शानदार अर्धशतक आणि एबी डिव्हिलियर्स च्या 35 धावा या जोरावर आरसीबी ने सात बाद 152 धावा केल्या होत्या दिल्लीच्या नॉर्खिया याने तीन तर रबाडा याने दोन गडी बाद केले होते.

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर