Join us  

मोठी बातमी: IPL 2020 यूएईत खेळवण्यास सरकारनं दिली परवानगी, ब्रिजेश पटेल यांची माहिती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 6:16 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाल्याची माहिती गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

बीसीसीआयच्या माहितीनंतर 8 फ्रँचायझींनी खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पटेल यांनी सांगितले की,''आम्हाला लेखी परवानगी मिळाली आहे.''

यूएईत होणाऱ्या आयपीएलसाठी 20 ऑगस्टला बहुतेक संघ रवाना होणार आहेत. माजी विजेता चेन्नई सुपर किंग 22 ऑगस्टला रवाना होण्याची शक्यता आहे. काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या कोरोना चाचणीची तयारी केली आहे आणि प्रमुख शहरांतून ते यूएईला रवाना होणार आहेत. ''फ्रँचायझींनी PCR टेस्ट करून घेणे कधीही चांगले आणि निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन ते यूएईत दाखल होत असतील तर अतीउत्तम. त्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या SOPनुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी 24 तासांत दोन कोरोना चाचणी कराव्या लागतील,''असे फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं सांगितले. ते पुढे म्हणाले,''दोन कोरोना चाचणी करणे अनिवार्य असताना काही फ्रँचायझी भारत सोडण्यापूर्वी चार चाचण्या करणार आहेत.''

महत्त्वाचे मुद्दे- 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार लीग- 10 डबल हेडर सामने ( 3.30 वाजता होतील सामने)- दुबई, शाहजाह आणि अबुधाबी येथे होतील सामने- महिला ट्वेंटी-20 चॅलेंज होणार, तीन संघांमध्ये चार सामने खेळवण्यात येणार

IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली! 

आयपीएल होत असल्याचे निश्चित झाल्याने सर्वांना आनंद झाला आहे. आयपीएल यूएईत होणार असल्यानं चारवेळचा विजेता मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. यापूर्वी 2014मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा यूएईत पार पडला होता. 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण आयपीएल भारताबाहेर होण्याची ही पहिली वेळ आहे. 2014मध्ये झालेल्या आयपीएलचे एकूण 20 सामने यूएईत झाले होते. त्यापैकी 7 सामने अबु धाबी, 6 सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आणि 7 सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाले होते.

दुबई स्टेडियमवर 109 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, तर शाहजाहवर 263 आणि अबु धाबीत 103 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलच्या 20 सामन्यांपैकी 11 सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकली आहेत. 8 सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकली आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला. पण, मुंबई इंडियन्सची चिंता वाढवणारी आकडेवारी अशी की, त्यांना येथे एकही सामना जिंकता आलेला नाही.  मुंबई इंडियन्सना यूएईत झालेल्या पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. किंग्स इलेव्हन पंजाबनं सर्वच्या सर्व पाचही सामने जिंकले आहेत. 

  1. किंग्स इलेव्हन पंजाब - 5 सामने , 5 विजय
  2. चेन्नई सुपर किंग्स - 5 सामने, 4 विजय, 1 पराभव
  3. राजस्थान रॉयल्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभव
  4. कोलकाता नाईट रायडर्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभव
  5. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
  6. सनरायझर्स हैदराबाद - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
  7. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
  8. मुंबई इंडियन्स - 5 सामने, 5 पराभव

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

IPL 2020 टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत पतंजली; दंत कांती फॅन बॉक्स अन् च्यवनप्राश षटकार, पडतोय मिम्सचा पाऊस 

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... 

टीम इंडियातील आणखी एक सदस्य पॉझिटिव्ह; एकूण सहा जणांना कोरोना

विराट, रोहित अन् धोनीची लॉकडाऊनमध्ये हवा; जागतिक अभ्यासातून समोर आली मोठी आकडेवारी

...तर 264 कोटींत 'पतंजली'ला मिळू शकतात IPL 2020 च्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क!

 

टॅग्स :आयपीएल 2020संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआय