हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन, पाहा VIDEO 

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे हा कार्यक्रम सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 20:54 IST2017-12-21T20:47:08+5:302017-12-21T20:54:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
We are Rahi's love! Virat-Anush's Grand reception in Delhi, see VIDEO | हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन, पाहा VIDEO 

हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन, पाहा VIDEO 

नवी दिल्ली - नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे हा कार्यक्रम सुरू आहे.  या सोहळ्यासाठी क्रिकेटसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत.  
आज होत असलेल्या रिसेप्शन सोहळ्यासाठी विराट आणि अनुष्काने पारंपरिक  पोशाख केला आहे. विराटने कोट घालता असून, अनुष्काने लाल रंगाची जरीकाम केलेली साडी परिधान केली आहे. 




आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मंगळवारी दिल्लीत आल्यानंतर नवविवाहित जोडप्याने  21 डिसेंबरला होणाऱ्या रिसेप्शनची जोरदार तयारी केली होती.    मुंबईत होणाऱ्या बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज या रिसेप्शनला हजर राहण्याची शक्यता आहे. तर २६ तारखेला मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत. 
 11 डिसेंबर रोजी विराट आणि अनुष्का  विवाहबंधनात अडकले होते. इटलीच्या बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये दोघांचे लग्न झाले. हे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हाॅटेल म्हणूनही ओळखले जाते. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे. स्वतः विराट आणि अनुष्काने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती. 



लग्न आणि हनिमूननंतर भारतात परतल्यावर नव्या जोडप्याच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी अनुष्काने गुलाबी रंगाचा  पंजाबी ड्रेस घातला असून तिच्या हातात चुडाही आहे. तर विराटने क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. 
 विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच पंतप्रधानांचे आशीर्वाद घेऊन त्यांना बुधवारी आयोजित केलेल्या रिसेप्शन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.   

Web Title: We are Rahi's love! Virat-Anush's Grand reception in Delhi, see VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.