Join us

विराटपेक्षाही 'फिट' आहे त्याची 'बॉस'; हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'फिट्ट है बॉस'

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:02 IST

Open in App

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. विराटने तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लग्नानंतर ही जोडी खूप कमी वेळा एकत्र दिसली पण काही ना काही कारणामुळे सत्तत चर्चेत असतात. 

आयपीएलनंतर विराट कोहली आपल्या आगामी मालिकांची तयारी करत आहे. तर अनुष्का शर्मा चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सर्व बिझी शेड्युलमधून वेळ काढत दोघेही एकत्र वेळ घालवत आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का सोबतच जिममध्ये दिसत असून, अनुष्काने वर्कआऊटला सुरुवात केल्यानंतर विराटने व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी विराटने अनुष्काची स्तुतीही केली. जिममध्ये अनुष्का शर्मा एकाद्या बॉस प्रमाणे व्यायाम करत आहे असे विराट कोहली या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. 

विराट अनेकदा अनुष्कासोबत व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रमावर शेअर करत असतो. आयपीएल संपल्यानंतर विराट सध्या विश्रांती घेतो आहे. मात्र अनुष्का सध्या तिच्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

 

टॅग्स :विराट कोहलीविरूष्काअनुष्का शर्मा