Join us
Daily Top 2Weekly Top 5

ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?

जड्डूच्या तोऱ्यावर पंतची खास कमेंट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 22:46 IST

Open in App

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्लेच्या मैदानातील कसोटी सामन्यात चेंडू बदलण्याच्या कारणावरुन भारतीय खेळाडू आणि पंच यांच्यात मतभेदाचे चित्र पाहायला मिळाले. चेंडू बदलण्याची मागणी फेटाळल्यावर अंपायर पॉल रीफेल यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यामुळे रिषभ पंतला १ डिमेरिट पॉइंट्सच्या रुपात शिक्षाही झाली. पाचव्या दिवशी पुन्हा याच मुद्यावरून भारतीय कर्णधार शुबमन गिलसह संघातील अन्य खेळाडूंनी मैदानातील पंचाकडे धाव घेतली. पण यावेळीही टीम इंडियाच्या हाती सुरुवातीला निशाराच आली. मैदानातील पंचांनी मागणी फेटाळल्यावर इंग्लंडच्या प्रेक्षकांनीही भारतीय खेळाडूंची मजाक घेतली. पण शेवटी इंग्लंडच्या डावातील २७ व्या षटकानंतर चेंडू बदलण्यात आला. यावेळी जड्डूनं थेट पंचासमोर जात विजयी आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या कृतीनंतर जड्डू गोलंदाजीला आल्यावर रिषभ पंतची विकेट मागून केलेली कमेंटही चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जड्डूनं पंचासमोर दाखवले तेवर

 पाचव्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाच्या कर्णधारासह अन्य खेळाडू वारंवार चेंडू बदलण्याची मागणी करताना दिसले. मोहम्मद सिराज, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनीही कॅप्टन शुबमन गिलला साथ दिली. पण पंचांनी चेंडूचा आकार तपासण्याच्या गेजमधून चेंडू तपासत त्याच चेंडूवर खेळ सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. २७ व्या षटकानंतर अखेर मैदानातील पंच गॅफनी आणि रीफेल यांनी चेंडू बदलण्याचा इशारा केला. हा भारतीय खेळाडूंचा एक विजयच होता. रवींद्र जडेजाने तर थेट पंचांच्या समोर जाऊन या गोष्टीचा आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. 

यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला

जड्डूच्या तोऱ्यावर पंतची खास कमेंट, म्हणाला...

चेंडू बदलल्यानंतर जड्डू गोलंदाजीला आल्यावर रिषभ पंतनं ऑलराउंडरच्या तोऱ्यावर खास कमेंट केल्याचे पाहायला मिळाल. जडेजा हा "मेरा ही गेम, मेरा ही बॉल मेरा ही अंपाय मेरा ही फिल्ड" अशा तोऱ्यावर वावरतोय, अशी मजेशीर कमेंट रिषभ पंतने केली. जी स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली. चौथ्या दिवशी आपल्याला ज्या गोष्टीवरुन शिक्षा झाली त्याचा बदलाही त्याने या कमेंटमधून घेतल्याचे दिसून आले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजारिषभ पंत