Join us

Virat Kohli's pushpa style dance : विराट कोहलीचा 'पुष्पा' स्टाईल डान्स; अपयशाशी झगडणाऱ्या कोहलीचा 'हसरा' चेहरा चाहत्यांना करून केला Emotional, पाहा Video 

Virat Kohli's pushpa style dance - भारतीय संघाचा व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली हा सध्या बॅड पॅचमधून जातोय... २०१९नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:43 IST

Open in App

Virat Kohli's pushpa style dance - भारतीय संघाचा व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली हा सध्या बॅड पॅचमधून जातोय... २०१९नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर तो मुक्तपणे खेळेल अशी अपेक्षा होती, पण तसेही काही घडताना दिसत नाही. आयपीएल २०२२त  विराटने मागील ९ डावांत ४१*, १२, ५ , ४८, १, १२, ०, ०, ९ अशी कामगिरी केली आहे. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाचवायची असेल तर आयपीएल २०२२तून माघार घे असा सल्ला दिला. विराटचा फॉर्म कधी परत येईल याची चाहते चातका प्रमाणे वाट पाहत आहेत. विराटही या कामगिरीमुळे निराश असेल अन् त्याचे चाहतेही त्याच्यावर रागावले असतील. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेच काय तर विरोधकही इमोशनल झाले असतील हे नक्की...

RCB व  ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मागील महिन्यात भारतीय वंशाच्या विनि रमण ( Vini Raman) सोबत विवाह बंधनात अडकला. मॅक्सवेल व विनी हे दोघंही गेली अनेक वर्ष एकमेकांसोबतच आहेत. आयपीएल २०२२ला सुरुवात होण्याआधी मॅक्सवेल व विनी यांनी ऑस्ट्रेलियन व भारतीय अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. लग्नसोहळ्यामुळेच मॅक्सवेलला आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळता आले नव्हते. भारतात परतल्यानंतर मॅक्सवेलने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सहकाऱ्यांना त्याच्या लग्नाची पार्टी दिली. या पार्टीतला एक व्हिडीओ समोर आला आहे... यात विराटचा हसरा चेहरा पाहून सारेच इमोशनल झाले आहेत.

पाहा Video..  

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरग्लेन मॅक्सवेल
Open in App