IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांच्या मोहिमेची सुरूवात रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीने करेल. विराट कोहली कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी फॅफ ड्यू प्लेसिसच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. RCB ने २००९, २०११ व २०१६ साली आयपीएल जेतेपदापर्यंत मजल मारली होती, परंतु त्यांना अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. आयपीएलमध्ये स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ, ही ओळख RCB ने यंदाही जपली आहे. यावेळेस आयपीएल पुन्हा होम-अवे फॉरमॅटमध्ये होणार आहेत आणि RCB चे फॅन्स खूप आनंदात आहेत. RCB ही यंदा आयपीएल जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत.
IPL 2023 : ऐकेकाळी सफाई कर्मचाऱ्याचं करायचा काम अन् आज विमानातून करतोय प्रवास; KKRच्या २५ वर्षीय खेळाडूची संघर्षगाथा
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने तसा निर्धारही व्यक्त केला. पण, त्याला बोलायचे होतं वेगळं अन् तो बोलून गेला वेगळं. फॅफला ए साला कप नामदे ( यंदा कप आमचाच) असं बोलायचं होतं, परंतु तो बोलून गेला ए साला कप नही. त्याचं हे विधान ऐकून विराट कोहलीही हसू लागला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फॅफ ड्यू प्लेसिस, आकाश दीप, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, फिन अॅलन, करन शर्मा, एस प्रभुदेसाई, अनुज रावत, सिद कौल, शाहबाज अहमद, रजत पाटिदार, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, जोश हेझलवूड, रिसे टॉप्ली, हिमांशू शर्मा, विल जॅक्स, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंद, सोनू यादव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"