Join us

IPL 2021: टीम साऊदीनं डिवचलं अन् अश्विन थेट अंगावर धावून गेला, पंतही भिडला; भर मैदानात जोरदार राडा, पाहा Video

IPL 2021, KKR vs DC: आर.अश्विन आणि टीम साऊदीमध्ये जोरदार राडा, दिनेश कार्तिकनं केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 18:01 IST

Open in App

IPL 2021, KKR vs DC: आयपीएलमध्ये आज शारजाच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं कोलकातासमोर विजयासाठी १२८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं. संघाच्या धावसंख्येला गती देण्यासाठी अखेरच्या षटकांमध्ये दिल्लीच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश येताना दिसलं नाही. त्यात अखेरच्या षटकामध्ये मैदानात एक राडा झाला. 

दिल्लीच्या डावातील अखेरचं षटक कोलकाताचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी टाकत होता. साऊदनं टाकलेल्या शॉर्ट पिच बॉलवर मोठा फटका मारण्याचा अश्विननं प्रयत्न केला. पण त्याचा झेल टिपला गेला. बाद झाल्यानंतर माघारी परतत असताना टीम साऊदीनं अश्विनला डिवचलं. मग काय अश्विननंही टीम साऊदीला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आणि मैदानात वाद झाला. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन देखील पुढे येत असल्याचं अश्विननं पाहिलं आणि तो पुन्हा माघारी फिरला अन् साऊदी, मॉर्गनच्या अंगावर धावून गेला. यावेळी ऋषभ पंत देखील पुढे सरसावला. दिनेश कार्तिकनं मध्यस्थी करत अश्विन, पंतला रोखलं. 

डाव संपल्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत अश्विन सामन्याच्या पंचांकडे घडलेल्या घटनेबाबत तक्रार करत असल्याचंही दिसून आलं. यात दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग देखील पंचांशी या प्रकरणावर चर्चा करताना पाहायला मिळाला. 

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सआर अश्विन
Open in App