Join us

Video : सामन्यादरम्यान कर्णधारासमोरच हॅरिस रौफने कामरान गुलामच्या कानाखाली वाजवली

PSL Video : हॅरिस रौफने गडी बाद करताच कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीसमोर सहकारी कामरान गुलामला खानाखाली मारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 06:41 IST

Open in App

कराची : पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या पर्वात सोमवारी पेशावर झाल्मी आणि लाहोर कलंदर यांच्यातील सामना रोमांचक झाला.  सामन्यादरम्यान लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने गडी बाद करताच कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीसमोर सहकारी कामरान गुलामला खानाखाली मारली, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  चाहते हॅरिस रौफवर टीका करीत आहेत. पेशावर झाल्मीच्या डावाच्या दुसऱ्या षटकात ही घटना घडली. हॅरिस रौफ गोलंदाजी करीत होता. त्याच्या चेंडूवर कामरान गुलामने पेशावर झाल्मीचा सलामीवीर हजरतुल्ला जझाईचा झेल सोडला. यावर रौफ खूप संतापला. त्याच षटकात रौफने मोहम्मद हॅरिसला बाद केले आणि सर्व खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी त्याच्याकडे आले. 

टॅग्स :पाकिस्तान
Open in App