Join us

या टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये नक्की विराट कोहलीच आहे का, पाहा आणि ठरवा...

एक चांगली लव्ह स्टोरी या व्हिडीमध्ये दाखवली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 16:40 IST

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला टिकटॉकच्या व्हिडीओची चलती आहे. प्रत्येक जण टिकटॉकचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली प्रेम व्यक्त करत असल्याचं दिसत आहे. एक चांगली लव्ह स्टोरी या व्हिडीमध्ये दाखवली गेली आहे.

खरं प्रेम नक्की असतं तरी काय, हे कोहलीच्या टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असली तरी त्या व्यक्तीची आवड नेमकी काय आहे, हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. पण या व्हिडीओमध्ये नेमका कोहलीच आहे का?

पाहा हा खास व्हिडीओ

आता तुम्ही ओळखलं असेल, हा कोहली नसून त्याचासारखा दिसणारा दुसरा व्यक्ती आहे. या व्यक्तीचे नाव गौरव अरोरा असून तो सेम टू सेम विराटसारखाच दिसत आहे.

टॅग्स :विराट कोहलीटिक-टॉक