मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या काही मिनिटात भारताला मोठा धक्का बसला असता. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला 47 धावांवर जीवदान मिळाल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू कोहलीच्या बॅटचे चुंबन घेत यष्टिरक्षकाच्या हातात विसावला असता, परंतु टीम पेनला तो चेंडू टिपता आला नाही. ऑस्ट्रेलियाने ही सुवर्णसंधी गमावली, परंतु भारतीय चाहत्यांनी जल्लोष केला.
30 वर्षीय कोहली ऑस्ट्रेलियाला दुसरी संधी देण्याच्या कोणत्याच मुडमध्ये नाही. कोहली नाबाद 47 धावांवर आणि चेतेश्वर पुजारा नाबाद 68 धावांवर खेळत आहेत.
पाहा व्हिडीओ...मयांक अग्रवाल व हनुमा विहारी या नव्या जोडीला संधी देण्यात आली. या जोडीने चिवट खेळ करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्या मजबूत पायाभरणीवर अन्य फलंदाजांनी दर्जेदार खेळी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा उभारुन दिल्या.