Join us

Video - KKRच्या खेळाडूचा पारा चढला, प्रथम स्टम्पला मारली लाथ, अम्पायरच्या अंगावर गेला धावून अन्...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या बांगलादेशचा स्टार शाकिब अल हसन याच्याकडून अनपेक्षित कृती घडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 16:28 IST

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या बांगलादेशचा स्टार शाकिब अल हसन याच्याकडून अनपेक्षित कृती घडली. ढाका प्रीमिअर लीगमध्ये अष्टपैलू खेळाडू शाकिब मोहम्मदीन स्पोर्टिंग क्लबचा कर्णधार आहे आणि अबहानी लिमिटेड विरुद्धच्या सामन्यात त्याचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या गोलंदाजीवर अम्पायरने पायचीत न दिल्यानंतर त्याने स्टम्पला लाथ मारली आणि पंचांशी हुज्जत घालू लागला. त्याचा हा अवतार पाहून सहकारी खेळाडूही अचंबित झाले. षटक संपल्यानंतर तो पुन्हा अम्पायरच्या दिशेनं धावला अन् स्टम्पच फेकून दिले.

मोहम्मदीन संघाच्या कर्णधारानं 27 चेंडूंत 37 धावा केल्या आणि संघाला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 145 धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना अबहानी संघाचे 3 फलंदाज 31 धावांवर माघारी परतले होते आणि तेव्हा शाकिबनं हे अशोभऩीय कृती केली.  पाहा व्हिडीओ...

टॅग्स :बांगलादेशकोलकाता नाईट रायडर्स