Join us

महेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 18:02 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली. भारतानं तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर एक डाव व 202 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाज दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश दिला. या सामन्यात धोनीची उपस्थिती लक्षवेधी ठरली. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी प्रथमच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसला.

बीसीसीआयनं धोनी ड्रेसिंग रुममध्ये शाहबाज नदीमशी चर्चा करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण, धोनीची मैदानावरील एन्ट्री सर्वांना मोहित करणारी ठरली. बाईक्स आणि कारची आवड असलेल्या धोनीच्या ताफ्यात नवी कोरी गाडी दाखल झाली आहे आणि त्याच गाडीनं धोनी झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये दाखल झाला. एसयूव्ही निसान जोंगा असे या गाडीचे नाव आहे. ही गाडी विशेष करून भारतीय सैन्यदलात वापरण्यात येत होती.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवान