Join us

Shocking : पाकिस्तानातील गरजूंना आर्थिक मदतीसाठी सुरू होता चॅरिटी सामना, पण मैदानावर झाला भलताच राडा, Video

पाकिस्तानातील गरजूंना वैद्यकिय मदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी इंग्लंडमधील मॉटे पार्क क्लब येथे चॅरीटी सामना खेळवण्यात आला,

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:56 IST

Open in App

पाकिस्तानातील गरजूंना वैद्यकिय मदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी इंग्लंडमधील मॉटे पार्क क्लब येथे चॅरीटी सामना खेळवण्यात आला, परंतु या सामन्यात क्रिकेट कमी अन् हाणामारीच जास्त झाली. खेळाडूंनी एकमेकांना बॅटीने मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्रेव्हसेंट आणि मेडवे या दोन क्लबमध्ये हा सामना खेळवण्यात आला होता, परंतु शाब्दिक वादानं आक्रमक रुप घेतलं अन् खेळाडू एकमेकांना मारताना दिसले. 

आयोजक शेहजाद अक्रम यांनी सांगितले की, चॅरीटी सामना यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि या अशा लोकांमुळे ते व्यर्थ गेले. अंतिम सामन्यातील अखेरची काही षटकं बाकी होती अन् अचानक काही लोकं मैदानावर घुसली व खेळाडूंना मारहाण करू लागली. यामागचं कारण काही कळले नाही. बॅटीनं ते एकमेकांना मारत होते. मी खूप लांब होतो, परंतु जेव्हा जवळ गेलो तोपर्यंत त्यांची मारामारी सुरूच होती. ''

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड