Join us  

Wow... जेसन रॉयची कमाल, असा अफलातून कॅच तुम्ही पाहिलाच नसेल, Video

ट्वेंटी-20 क्रिकेट म्हणजे क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 12:59 PM

Open in App

ढाका : ट्वेंटी-20 क्रिकेट म्हणजे क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन... ट्वेंटी-20 क्रिकेटने झेल टिपण्याच्या नवनवीन स्टाईल प्रचलित केल्या. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करण्याची खूपच मूभा मिळते. पण, त्याचवेळी गोलंदाजांप्रमाणए क्षेत्ररक्षकही फलंदाजांच्या फटकेबाजीवर लगाम लावण्याची एकही संधी गमावताना दिसत नाही. त्यामुळेच चेंडू अगदी सहज सीमारेषा पार करेल, असे वाटत असताना मध्येच क्षेत्ररक्षक सुपरमॅन सारखा झेपावतो आणि अप्रतिम कॅच टिपतो. सध्या क्रिकेटमध्ये ही गोष्ट नवी राहिलेली नाही.

पण, इंग्लंडच्या जेसन रॉयने शनिवारी असा झेल टिपला की चाहत्यांनाही जागेवर उभं राहून टाळ्यांचा कडकडात आवरावास वाटला नाही. बांगलादेश प्रीमिअर लीगमधील सिलहत सिक्सर्स आणि चितगाँव विकिंग्स यांच्यातील या सामन्यांतील हा तो अफलातून झेल. धावांचा पाठलाग करणाऱ्या चितगाँव संघाचा फलंदाज यासीर अली 27 धावांवर खेळत होता. त्याने आलोक कपालीच्या गोलंदाजीवर एक जोरदार फटका मारला आणि चेंडू सीमारेषेपार सहज जाईल असा ठाम विश्वास त्याला होता. मात्र, दुसरीकडे रॉय तयारीतच होता. त्याने सीमारेषेजवळच हवेत झेप घेत एका हाताने तो चेंडू टिपला आणि यासीरला तंबूत जावे लागले. सिक्सर्सने हा सामना 29 धावांनी जिंकला, परंतु रॉयचा तो झेल हाच चर्चेचा विषय राहिला.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :बांगलादेशइंग्लंडटी-20 क्रिकेट