Join us

India vs Australia : दिनेश कार्तिकने आठवण करून देताच महेंद्रसिंग धोनीने बॅट उंचावली

दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने मिळवलेला विजय यापेक्षा महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही सर्वात आनंदाची गोष्ट मानली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:18 IST

Open in App

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने मिळवलेला विजय यापेक्षा महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही सर्वात आनंदाची गोष्ट मानली जात आहे. पहिल्या सामन्यातील संथ खेळीवर झालेल्या टीकेनंतर धोनीने अॅडलेडवर जोरदार फटकेबाजी केली. त्याने अंतिम षटकात खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर भारताचा विजयही पक्का केला. पण, अखेरच्या षटकात धोनी एक गोष्ट करायला विसरला आणि दिनेश कार्तिकने त्याची आठवण करून दिली.

भारताला अखेरच्या षटकात सात धावांची आवश्यकता होती आणि धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. या षटकारासह धोनीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कार्तिक त्याच्याकडे धावत आला आणि धोनीला अर्धशतक झाल्याची आठवण करून दिली. पाहा व्हिडीओ... धोनीच्या या खेळीचं सोशल मीडियावर कौतुक झालं. याच सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं 39 वं वन डे शतक पूर्ण केलं. धोनीनं चौथ्या विकेटसाठी कोहलीसाठी 82 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा  व अंतिम वन डे सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादिनेश कार्तिक