ठळक मुद्देसामन्यानंतर दीपकनं त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली.
Ipl 2021 Deepak Chahar: लोकेश राहुलच्या नाबाद ९८ धावांनी पंजाब किंग्सला (Punjab Kings) मोठा विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्सनं हा सामना गमवला असता तरी गुणतालिकेतील त्यांचे दुसरे स्थान कायम आहे. पण, या सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर प्रेमाची मॅच झाली अन् त्यात CSKचा गोलंदाज दीपक चहरनं बाजी मारली. सामन्यानंतर दीपकनं त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
त्यानंतर CSK च्या खेळाडूंनी आपल्या अंदाजात दोघांचं अभिनंदन केलं. याचा व्हिडीओ चेन्नई सुपरकिंग्सनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. दीपक चहर आणि त्याचं गर्लफ्रेन्ड दोघंही जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा सीएकेच्या खेळाडूंनी दोघांचं टाळ्या वाजवत स्वागत केलं. त्यानंतर सर्वांनी हा आनंदाचा क्षण सेलिब्रेटही केला.
दरम्यान सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (CSK skipper MS Dhoni) यानं पूर्ण प्लॅनिंग करून दीपकला मागून पकडून ठेवलं. त्यानंतर टीमच्या सदस्यांनी दीपक चहरच्या तोंडाला केक लावला. तर दुसरीकडे साक्षी धोनीनं जयालाही केक भरवला आणि तिच्याही तोंडाला केक लावला. जया ही दिल्लीची रहिवासी असून ती एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करते. जया ही बिग बॉस फेस सिद्धार्थ भारद्वाजची (Sidharth Bharadwaj) बहिण आहे.