Join us

Video : अनुष्कानं विराटचं काय केलं पाहा, सोशल मीडियावर एकच चर्चा

सेलिब्रेटी जोडींमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे नाव आवर्जुन घेतले जात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 16:40 IST

Open in App

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सेलिब्रेटी जोडींमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडीचे नाव आवर्जुन घेतले जात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कोट्यवधी फॅन्स आहेत. विरुष्काच्या प्रत्येक हालचालींवर हे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नजर ठेवून असतात. त्यामुळे विरुष्काच्या प्रत्येक फोटो किंवा व्हिडीओंना असंख्य लाईक्स मिळतात. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने कोहलीची केलेली अवस्था पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कोहलीच्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 299 धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांची दमदार कामगिरी केली. कोहलीच्या शतकी खेळीला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाबाद 55 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. त्यामुळेच भारताने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. अनुष्काही ऑस्ट्रेलियात आहे. कोहली व अनुष्का यांचे ऑस्ट्रेलियातील अनेक फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यात बुधवारी अनुष्काने फेस फिल्टर करून कोहलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर तिनं ‘Cutie’ असही लिहीलं आहे. अॅडलेड वन डे सामन्यात कोहलीने 39वे वन डे शतक झळकावले. 2019 मधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्का