Join us  

Video : हरमनप्रीत कौरची विचित्र विकेट, इंचभर अंतराने हुकली फिफ्टी; भारताच्या चारशेपार धावा 

India Women vs England Women, Only Test - भारतीय महिला संघ बऱ्याच वर्षांनी कसोटी क्रिकेट खेळायला मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 5:06 PM

Open in App

India Women vs England Women, Only Test - भारतीय महिला संघ बऱ्याच वर्षांनी कसोटी क्रिकेट खेळायला मैदानावर उतरला आहे. इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी चारशेपार धावांचा डोंगर उभा केला आहे. शुभा सथिश, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया व दीप्ती शर्मा यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी आजचा दिवस गाजवला. पण, ४९ धावांवर बाद झालेली कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटची रंगलीय चर्चा... हरमनप्रीतचे कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक अवघ्या १ धावांनी विचित्र पद्धतीने बाद झाल्याने हुकले..

डी वाय पाटीलवर सुरू असलेल्या या कसोटीत स्मृती मानधना ( १७) व शफाली वर्मा ( १९) यांना मोठी खेळी करता आली नाही. लॉरेन बेल व केट क्रॉस यांनी त्यांना बाद केले. पदार्पणवीर शुभा व जेमिमा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. शुभाने ७६ चेंडूंत ६९ धावा केल्या, तर जेमिमाने ९९ चेंडूंत ६८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभी होती. पण, फिफ्टी पूर्ण करण्यासाठीची धाव पूर्ण करताना तिची बॅट अडकली अन् रन आऊट होऊन ती माघारी परतली.  

हरमनप्रीतने ८१ चेंडूंत ४९ धावा केल्या. तिच्यानंतर यास्तिका व दीप्ती यांनी डाव सारवला. यास्तिका ८८ चेंडूंत ६६ धावा करून माघारी परतली. स्नेह राणानेही ३० धावांची खेळी केली. दीप्ती ६० धावांवर खेळतेय आणि भारताच्या ९४ षटकांत ७ बाद ४१० धावा झाल्या आहेत. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघहरनमप्रीत कौरभारत विरुद्ध इंग्लंड