Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी

IND vs NZ ODI Ayush Badoni Replacing Injured Washington Sundar : पहिल्या वनडेतील दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर आउट, कुणाला मिळाली संधी? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:00 IST

Open in App

IND vs NZ ODI Ayush Badoni Receives Maiden Call Up Replacing Injured Washington Sundar : न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पंतपाठोपाठ आता दुसरा धक्का बसला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पहिल्या वनडेत झालेल्या दुखापतीनंतर उर्वरित मालिकेतून संघाबाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर BCCI निवडकर्त्यांनी नव्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. आयुष बडोनी याला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. IPL मध्ये लक्षवेधी ठरलेल्या या युवा क्रिकेटरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्यातील धमक दाखवून दिली आहे. उर्वरित दोन सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळणार का ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Washington Sundar Out; Ayush Badoni Gets Maiden India Call-up!

Web Summary : Washington Sundar is out of the ODI series due to injury. Ayush Badoni receives his first India call-up as his replacement, showcasing domestic prowess.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडवॉशिंग्टन सुंदर