IND vs NZ ODI Ayush Badoni Receives Maiden Call Up Replacing Injured Washington Sundar : न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पंतपाठोपाठ आता दुसरा धक्का बसला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पहिल्या वनडेत झालेल्या दुखापतीनंतर उर्वरित मालिकेतून संघाबाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर BCCI निवडकर्त्यांनी नव्या चेहऱ्याला पसंती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेत युवा चेहऱ्याची टीम इंडियात एन्ट्री
वॉशिंग्टन सुंदहर उर्वरित दोन वनडेतून बाहेर पडल्याने, BCCI निवड समितीने आयुष बडोनीला त्याचा बदली खेळाडूच्या रुपात टीम इंडियात सामील करुन घेतले आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या याची घोषणा केली आहे. दिल्लीकर बॅटर पहिल्यांदाच टीम इंडियात स्थान मिळाले असून त्याला पदार्पणाची संधी मिळणार का ते पाहण्याजोगे असेल. तो राजकोटमध्ये संघात सहभागी होईल, जिथे दुसरा वनडे होणार आहे.
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
आयुष बडोनीची कामगिरी
२६ वर्षीय आयुष बडोनी याने आतापर्यंत २७ लिस्ट ‘ए’ सामने खेळले आहेत. यात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावत ३६.४७ च्या सरासरीने ६९३ धावा केल्या आहेत. तो मिडल ऑर्डरमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यासोबतच स्पिन गोलंदाजीही करू शकतो. लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८ विकेट्स आहेत. आयुष बडोनी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. आयपीएल कारकिर्दीत त्याने आतापर्यंत ५६ सामने खेळत ९६३ धावा केल्या आहेत आणि ४ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये त्याला फक्त सात डावांतच गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे.
पहिल्या वनडेत दुखापत असूनही बॅटिंगसाठी मैदानात उतरला होता वॉशिंग्टन सुंदर
रविवारी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. २६ वर्षीय गोलंदाजाने न्यूझीलंडच्या डावात ५ षटके टाकून २७ धावा दिल्या, पण दुखापतीमुळे त्याला अर्ध्यावरच मैदान सोडावे लागले. तो पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी परतला नाही. भारतीय संघ अडचणीत असताना आठव्या क्रमांकावर तो फलंदाजीला आला. त्याला धाव घेणं मुश्किल असताना त्याने केएल राहुलसोबत २७ धावांची नाबाद भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.