गेल्या काही दिवसापासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे. पाकिस्तानमध्ये सामने सुरू आहेत. दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर विभागाने अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आयसीसीकडून जवळजवळ तीन दशकांनंतर पाकिस्तानमध्ये सामना आयोजित केला जात आहे, पण तरीही धोका टळलेला दिसत नाही. पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने इशारा दिला आहे.
बांगलादेशसह पाकिस्तान आउट! न्यूझीलंडच्या विजयासह भारतीय संघानंही गाठली सेमी फायनल
अनेक दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे, विशेषतः चिनी आणि अरब नागरिकांचे खंडणीसाठी अपहरण करण्याचा कट रचत असल्याचा अलर्ट दिला आहे. परदेशी नागरिकांवरील हल्ल्यांबाबत पाकिस्तानने कारवाई न केल्याचा आरोप आहे.
२००९ मध्ये श्रीलंका टीमवर हल्ला झाला होता
२००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर हल्ला झाला होता. या घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. २०२४ मध्ये, ISKP शी संबंधित अल अझैम मीडियाने १९ मिनिटांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. इस्लामविरुद्धच्या लढाईत क्रिकेट हे पश्चिमेकडील देशांचे आधुनिक शस्त्र आहे, यामध्ये असा दावा करण्यात आला होता.
अफगाणिस्तान संघाला पाठिंबा दिल्याबद्दल दहशतवाद्यांनी तालिबानवरही टीका केली. बलुचिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, ISIS आणि इतर दहशतवादी गटांकडून सुरक्षा उल्लंघन करण्याची तयारी करण्यात आल्याचे अहवाल म्हटले आहे. दहशतवादी चिनी आणि अरब नागरिकांवर लक्ष ठेवत आहेत.
अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने देखील ISKP कडून संभाव्य हल्ल्यांबद्दल इशारा जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला, भारताविरुद्धचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जात आहेत.