Join us  

वॉर्नर, स्मिथच्या जोरावर आॅस्ट्रेलिया विजयी

डेव्हिड वॉर्नरच्या आक्रमक ३९ आणि स्टीव्ह स्मिथच्या २२ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने स्टार खेळाडूंविना खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा सराव सामन्यात १ गडी राखून पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:47 AM

Open in App

ब्रिस्बेन : डेव्हिड वॉर्नरच्या आक्रमक ३९ आणि स्टीव्ह स्मिथच्या २२ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने स्टार खेळाडूंविना खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा सराव सामन्यात १ गडी राखून पराभव केला.स्मिथ व वॉर्नर यांनी निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले. आॅस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक २१६ धावांचे लक्ष्य १० चेंडू राखून पूर्ण केले.कर्णधार अ‍ॅरोन फिंचने ५२ धावा केल्या, पण उस्मान ख्वाजा स्वस्तात बाद झाला. वॉर्नरला खाते उघडण्यापूर्वी जीवदान लाभले होते. त्याचा लाभ घेत त्याने ४३ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. वॉर्नरने आयपीएल लीग फेरीत १२ सामन्यांत सर्वाधिक ६९२ धावा केल्या होत्या.स्मिथने ४३ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाईनंतर वॉर्नर व स्मिथ यांनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले.त्याआधी, पॅट कमिन्सने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. पण त्यानंतर न्यूझीलंडने सावध फलंदाजी करताना वन-डे सराव सामन्यात २१५ धावा केल्या. केन विलियम्सन, मार्टिन गुप्तील व ट्रेंट बोल्ट आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे न्यूझीलंड संघ कमकुवत भासत होता.ट्रेंट ब्लंडेलने ७७ धावा केल्या, पण संघाचा डाव ४६.१ षटकांत संपुष्टात आला. कमिन्सने ८ षटकांत ३६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. नॅथन कुल्टर नाईल व जासन बेहरेनडोर्फ यांनीही प्रत्येकी ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. स्मिथने लॅथमनचा झेल अप्रतिम टिपला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आॅस्ट्रेलियान्यूझीलंड