Join us

India vs New Zealand T20 : दुसऱ्या T20 सामन्यात #MeToo चे पोस्टर, या खेळाडूविरोधात घोषणाबाजी

मीटूचे वादळ भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही घोंगावलेले पाहालया मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 17:07 IST

Open in App

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : मीटूचे वादळ भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही घोंगावलेले पाहालया मिळाले. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या स्कॉट कॅगीलेन विरोधात काही प्रेक्षकांनी पोस्टरबाजी केली. ईडन पार्क येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रेक्षकांमध्ये एका महिलेच्या हातात मीटूचे पोस्टर दिसत होते आणि कॅगीलेन जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी काही प्रेक्षकांनी विरोधात घोषणाबाजीही केली. 

''Wake up New Zealand Cricket, #MeToo'' असे या पोस्टरवर लिहीले होते. हे पोस्टर कॅगीलेनच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्याच्यावर दोन वर्षांपूर्वी बलात्कराचा आरोप झाला होता. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातही कॅगीलेनला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. कॅगीलेनवर बलात्काराचा आरोप झाला होता आणि फेब्रुवारी 2017 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.  कॅगीलेनने आतापर्यंत दोन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. 17 मे 2015 साली हॅमिल्टन येथील एका फ्लॅटमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप कॅगीलेन याच्यावर करण्यात आला होता. 2016 मध्ये यावर सुनावरणी सुरू झाली आणि 2017 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमीटून्यूझीलंड