Join us

वाडेकर यांचा 'तो' अखेरचा डाव, मांजरेकरने शेअर केला व्हिडीओ

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 11:41 IST

Open in App

मुंबई - भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी निधन झाले. मात्र, वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते. शिवाजी पार्क आणि दादर युनियन यांच्यात गेल्यावर्षी एक प्रदर्शनीय सामना झाला होता, त्यामध्ये वाडेकर पॅड लावून बॅटिंगला उतरले होते. भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी वाडेकर यांच्या त्या अखेरच्या डावाचा व्हिडीओ शेअर केला आहे.पाहा तो व्हिडीओ... ( Ajit Wadekar: त्यांची आक्रमकता केवळ बॅट-बॉल युद्धापुरतीच..)

( वाडेकर यांनी 76व्या वर्षीही केली होती दमदार बॅटिंग )

वेस्ट इंडिज सारख्या दादा संघाला त्यांच्या मातीत नमवण्याचा पराक्रम त्यांनीच केला होता. त्यानंतर इंग्लंडलाही त्याच्या स्विंग खेळपट्टीवर भारताने पहिल्यांदा विजय त्यांनीच मिळवून दिला होता. भारत पहिला एकदिवसीय सामना खेळला तेव्हा कर्णधार होते ते वाडेकरच.

टॅग्स :अजित वाडेकरक्रिकेटक्रीडा