Join us

विशाखापट्टणम वनडे : भारताची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण, श्रीलंकेला पहिला धक्का

तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 14:28 IST

Open in App

विशाखापट्टणम -  तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. आजची लढत जिंकून 1-1 अशा बरोबरीत असलेल्या मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे. आजच्या लढतीसाठी भारतीय संघान एक बदल करण्यात आला असून, कुलदीप यादव याचे संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. चौथ्या षटकात धनुष्का गुणतिलका 13 धावांवर बाद झाला आहे. 

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविण्याच्या, तसेच मालिका खिशात घालण्याच्या निर्धारासह भारतीय संघ खेळत आहे. या मैदानावर भारताने २०१५ चा अपवाद वगळता सामना गमाविलेला नाही, हे विशेष. दुसरीकडे आठ मालिका गमाविणारा लंकेचा संघदेखील पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या आशेने उतरणार आहे. मोहालीत कर्णधार रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारताने सहज विजय नोंदविला. त्याआधी धर्मशालातील पहिला सामना लंकेने जिंकला होता. भारताने विशाखापट्टणममध्ये सात सामने खेळले. केवळ एक सामना गमावला. विजयाची घोडदौड कायम राखण्याच्या इराद्यानेच रोहित आणि कंपनी खेळणार, यात शंका नाही.

टॅग्स :क्रिकेट