एका चुकीमुळं विराट-अनुष्काला करावं लागणार पुन्हा लग्न

11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले होते. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला होता.  पण एका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:38 IST2018-01-08T14:07:33+5:302018-01-08T20:38:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virushka have to marry again because of this one mistake | एका चुकीमुळं विराट-अनुष्काला करावं लागणार पुन्हा लग्न

एका चुकीमुळं विराट-अनुष्काला करावं लागणार पुन्हा लग्न

नवी दिल्ली - 11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले होते. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला होता.  पण एका चुकीमुळं विरुष्काला या वर्षी पुन्हा एकदा लग्न करावं लागू शकते. 

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार,  इटलीमधील टस्कनीत विवाह सोहळा पार पडला. पण त्यांनी राजधानी रोममध्ये असलेल्या भारतीय दुतावासला याची कोणतीही सुचना दिली नाही. त्यामुळं लग्नाच्या नोंदणीमध्ये अडचण होण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील हेंत कुमार यांनी 13 डिसेंबर रोजी रोम येथील भारतीय दुतावासातून आरटीआयच्या माध्यमांतून माहिती काढली आसून. त्यामध्ये विरुष्कानं इटलीमध्ये लग्न करत असल्याचे रोममधील भारतीय दुतावासाला कळवले नव्हते. 

नियमानुसार, एखादी भारतीय व्यक्ती जर दुसऱ्या देशामध्ये लग्न करत असेल तर परदेशी विवाह अधिनियम 1969 नुसार तेथील भारतीय दुतावासमध्ये याबबात माहिती द्यावी लागते. त्यानुासर ते रजिस्टर्ड केली जातं. पण विराट आणि अनुष्कांचं लग्न या नियामानुसार झालंच. आता विराट कोहली आणि अनुष्का भारतात जिथे कुठे राहणार असतील. त्या राज्याच्या नियमानुसार त्यांना विवाह नोंदणी करत पुन्हा एकदा लग्न करावे लागेल. 

Web Title: Virushka have to marry again because of this one mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.