बाबा वीरेंद्र महाराज की जय! प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...

हे बाबा सध्याच्या तंत्रज्ञानातल्या युगातले आहेत त्यामुळेच ते ट्विटरच्या माध्यमातून आपले प्रवचन देत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:05 IST2019-08-20T17:03:59+5:302019-08-20T17:05:24+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
virender sehwag's twitter post get viral | बाबा वीरेंद्र महाराज की जय! प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...

बाबा वीरेंद्र महाराज की जय! प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारातमध्ये बरेच बाबा, महाराज आहेत. ज्यांची प्रवचनं तुफान चालतात आणि त्यांचा मोठा भक्त वर्ग असल्याचेही पाहायला मिळते. यामध्ये आता अजून एका प्रवचन देणाऱ्या महाराजांची भर पडली आहे. या बाबांचे प्रवचन ऐकाल तर जीवनात यशस्वी व्हाल, असे म्हटले जात आहे.

नजफगड निवासी हे बाबा प्रवचन देण्यात माहीर आहेत. पण हे बाबा सध्याच्या तंत्रज्ञानातल्या युगातले आहेत त्यामुळेच ते ट्विटरच्या माध्यमातून आपले प्रवचन देत असतात. आज त्यांनी अशीच एक पोस्ट ट्विटरवर टाकली आहे आणि ही पोस्ट चांगलीच वायरल होताना दिसत आहे.

आता हे नवीन बाबा कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता हे आध्यात्मिक गुरु कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे कुणी आध्यात्मिक गुरु नाही तर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे. सेहवाग आपल्या ट्विटरवरून उपदेश देत असतो. आजही सेहवागने अशीच एक पोस्ट टाकली आहे.

 

या पोस्टमध्ये सेहवागने म्हटले आहे की, " भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जित लेंगे अकेले!"

Web Title: virender sehwag's twitter post get viral