Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामातील शहीद जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदत

या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 18:46 IST

Open in App

नवी दिल्ली : रवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. 

सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल. "

यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले.

शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कमसलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकण्याचा मान विदर्भाच्या संघाने पटकावला आहे. विदर्भाचा संघ फक्त इतक्यावरच थांबला नाही, तर या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद  जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. गुरवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर विराट कोहलीने स्थगित केला पुरस्कार सोहळापुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतामध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आज होणारा RP-SG इंडियन स्पोर्ट्स हॉनर्स (भारतीय क्रीडा सन्मान) हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षापासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. 

गुरुवारी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये भारताच्या ४० जवानांना वीरमरण आले. यानंतर आज होणारा पुरस्कार कोहलीने स्थगित केल्याचे समजत आहे. कोहली याबाबत म्हणाला की, " 'RP-SG इंडियन स्पोर्ट्स हॉनर्स हा पुरस्कार आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत. सध्याच्या घडीला भारतीय शोकमग्न आहेत, त्यामुळे आम्ही हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. "

टॅग्स :विरेंद्र सेहवागपुलवामा दहशतवादी हल्ला