Virender Shewag Diwali Family Photo wife Aarti Missing: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने दिवाळीनिमित्त आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला. या फोटोत त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य दिसला, पण त्याची पत्नी आरती मात्र कुठेही दिसली नाही. फोटोतील पत्नीच्या अनुपस्थितीमुळे सेहवाग आणि तिच्या नात्यात दुरावा असलेल्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. सेहवागची पत्नी आरती हिचे बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मनहास सोबत प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. सेहवागच्या ताज्या फोटोतून या चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले आहे.
वीरेंद्र सेहवागने स्वतः दिवाळीनिमित्त कुटुंबाचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याची दोन्ही मुलं आर्यवीर आणि वेदांत हे त्याच्यासोबत दिसत होते. त्याचसह सेहवागची आईदेखील फोटोत दिसली. फोटो शेअर करत सेहवागने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. सेहवागच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली एक गोष्ट म्हणजे त्याची पत्नी अनुपस्थित दिसली. दिवाळीसारख्या खास प्रसंगी त्याच्या पत्नीची अनुपस्थिती बरंच काही सांगून गेली.
फोटोमध्ये पत्नी आरतीची अनुपस्थिती पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आहे की नाही हे स्पष्ट करते असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तशा आशयाच्या बातम्या मीडियामध्येही फिरत आहेत. त्यातच आता, दिवाळीनिमित्त समोर आलेल्या फोटोतून याची एकाअर्थाने पुष्टी झाल्याचेच बोलले जात आहे.
जरी आरती सेहवागच्या कुटुंबाच्या फोटोमधून गायब असली तरी, दिवाळीला तिचा तिच्या मुलांसोबतचा वेगळा फोटो दिसला. आरतीने स्वतः तो फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.
![]()
दरम्यान, सेहवाग आणि मिथुन मनहास हे खूप चांगले मित्र होते. दोघेही दिल्लीसाठी क्रिकेट खेळायचे. पण अलीकडे सेहवागची पत्नी आरतीचे मिथुनसोबत प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या आल्या. याबाबतचे सत्य अद्याप समोर आलेले नाही.