Virender Sehwag Tweet, IND vs WI: विरेंद्र सेहवागने Smriti Mandhana अन् Harmanpreet Kaurचा फोटो केला पोस्ट; सांगितला पुरूष अन् महिला क्रिकेटमधील अजब योगायोग

विरेंद्र सेहवाग कायमच त्याच्या हटके ट्वीट्समुळे चर्चेत असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 03:14 PM2022-03-12T15:14:12+5:302022-03-12T15:14:22+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag Tweet photo of Smriti Mandhana Harmanpreet Kaur highlights weird coincidence of men and women indian cricket IND vs WI | Virender Sehwag Tweet, IND vs WI: विरेंद्र सेहवागने Smriti Mandhana अन् Harmanpreet Kaurचा फोटो केला पोस्ट; सांगितला पुरूष अन् महिला क्रिकेटमधील अजब योगायोग

Virender Sehwag Tweet, IND vs WI: विरेंद्र सेहवागने Smriti Mandhana अन् Harmanpreet Kaurचा फोटो केला पोस्ट; सांगितला पुरूष अन् महिला क्रिकेटमधील अजब योगायोग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virender Sehwag Tweet, IND vs WI: भारताच्या महिला संघाने ICC Women's World Cup मध्ये वेस्ट इंडिजला १५५ धावांनी पराभूत केलं. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्या शतकांमुळे भारताच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला ४० षटकात १६२ धावाच करता आल्या. भारताने सामना मोठ्या फरकाने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यानंतर भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने एक फोटो शेअर करत पुरूष आणि महिला क्रिकेटमधील एक अजब योगायोग चाहत्यांच्या नजरेस आणून दिला.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्ध सुरूवात सर्वसाधारण केली होती. पण नंतर स्मृती आणि हरमनप्रीत दोघींनी संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. दोघींनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची विक्रमी भागीदारी केली. या सामन्यातील या दोघींचा पाठमोरा फोटो सेहवागने शेअर केला आणि एक अजब योगायोग सांगितला. स्मृतीचा जर्सी क्रमांक १८ तर हरमनप्रीतचा ७ आहे. पुरूष क्रिकेटमध्ये विराटचा जर्सी क्रमांक १८ आणि धोनीचा जर्सी क्रमांक ७ होता. याच मुद्द्यावर सेहवागने मजेशीर ट्वीट केलं. "अरे व्वा, जर्सी नंबर १८ आणि ७ यांनी पुरूषांचाया क्रिकेटमध्ये गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. आणि आज त्याच जर्सीमधील स्मृती आणि हरमनप्रीत या दोघींनी कमाल केला. झकास विजय", असं सेहवागने लिहिलं.

दरम्यान, भारताच्या ३१८ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांत बाद झाला. अनुभवी डिएंड्रा डॉटीनने अर्धशतक (६२) केले. बाकी कोणालाही फार चमक दाखवता आली नाही. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ बळी टिपले.

Web Title: Virender Sehwag Tweet photo of Smriti Mandhana Harmanpreet Kaur highlights weird coincidence of men and women indian cricket IND vs WI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.