वीरेंद्र सेहवागसह दोघांनी दिला क्रिकेट समितीचा राजीनामा

दिल्ली संघटनेमध्ये क्रिकेटची सुधारणा व्हावी, यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 18:05 IST2018-09-17T18:04:59+5:302018-09-17T18:05:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virender Sehwag resigns from Cricket committee | वीरेंद्र सेहवागसह दोघांनी दिला क्रिकेट समितीचा राजीनामा

वीरेंद्र सेहवागसह दोघांनी दिला क्रिकेट समितीचा राजीनामा

ठळक मुद्दे भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेगवागने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट समितीचा राजीनामा दिला आहे

नवी दिल्ली : भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेगवागने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट समितीचा राजीनामा दिला आहे. सेहवागबरोबर आकाश चोप्रा आणि राहुल संघवी यांनीही आपला राजीनामा संघटनेला पाठवला आहे.

दिल्ली संघटनेमध्ये क्रिकेटची सुधारणा व्हावी, यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या क्रिकेट समितीमध्ये सेहवाग, चोप्रा आणि संघवी या माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. पण आता या तिघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

" दिल्ली संघटनेमध्ये आकाश आणि राहुल यांच्याबरोबर माझी क्रिकेट समितीसाठी निवड केली होती. या निवडीनंतर आम्ही काही कामं केली आहेत. पण आता व्यस्त कार्यक्रमांमुळे आम्हाला या पदावर काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही तिघांनीही या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, " असे सेगवागने सांगितले.

Web Title: Virender Sehwag resigns from Cricket committee