Join us  

वीरुनं शेअर केला लहान मुलाचा Cute व्हिडीओ, सांगतोय Corona पासून वाचण्याचे उपाय

भारतातील रुग्णांचा आकडा हा 4314 वर पोहोचला असून आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू झाला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:12 PM

Open in App

जगभरात कोरोनाचे 12 लाख 74, 543 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 69, 487 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांचा आकडा हा 4314 वर पोहोचला असून आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू झाला आहे. 328 रुग्ण बरे झाले आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. वीरूनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

वीरूनं व्हिडीओवर लिहिलं की,''ही आपल्या सर्वांसाठी खुप महत्त्वाची गोष्ट आहे. हा मुलगा उत्तम पद्धतीनं आपल्याला काही समजावून सांगत आहे. कृपया करून तो काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐका आणि त्याचा सल्ला अमलात आणा.'' 

पाहा व्हिडीओ..

दरम्यान,  कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.

अन्य महत्त्वाचा बातम्या

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!

आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान

हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन

Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ 

गौतम गंभीरची दिल्ली सरकारला आणखी 50 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांवर टीका

मास्टर स्ट्रोक; 2011च्या वर्ल्ड कप फायनलमधील 'तो' गेम चेंजर निर्णय सचिन तेंडुलकरचा होता!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविरेंद्र सेहवाग