मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा आज (२० ऑक्टोबर २०२५) ४७वा वाढदिवस. 'नजफगडचा नवाब' आणि 'मुल्तानचा सुलतान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेहवागने आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक विक्रम नोंदवले आहेत, जे आजही मोडणे अत्यंत कठीण मानले जाते. २० ऑक्टोबर १९७८ रोजी दिल्लीच्या नजफगढ येथे जन्मलेल्या सेहवागने १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी२०) योगदान दिले.
एकूण ३७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सेहवागने १७,२५३ धावा ठोकल्या आहेत. यात २३ कसोटी शतके आणि १५ एकदिवसीय शतकाे (एकूण ३८) आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३१९ असून, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले आहे.
सेहवागचे ४ विक्रम आजही अढळ -
कर्णधार म्हणून सर्वात मोठी एकदिवसीय खेळी:एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आजही वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. ८ डिसेंबर २०११ रोजी इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधारपदाची धुरा सांभाळताना त्याने २१९ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली होती.
दोन तिहेरी शतके (भारताकडून एकमेव): कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा तिहेरी शतक (Triple Century) झळकावणारा सेहवाग हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्ध मुल्तान येथे (३०९) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई येथे (३१९) अशा दोन मोठ्या खेळी त्याने केल्या आहेत.
सर्वात वेगवान तिहेरी शतक (जागतिक विक्रम): कसोटी क्रिकेटमध्ये जगातील सर्वात जलद तिहेरी शतक (Triple Century) पूर्ण करण्याचा विक्रमही सेहवागच्याच नावावर आहे. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने केवळ २७८ चेंडूंमध्ये तिहेरी शतक ठोकले. चेन्नईतील या सामन्यात त्याने ४२ चौकार आणि ५ षटकारांसह ३०४ चेंडूंमध्ये ३१९ धावा केल्या होत्या.
एका दिवसात सर्वाधिक धावा (भारतीय विक्रम):
कसोटी सामन्यात एका दिवसात सर्वाधिक (२८४) धावा करणारा भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग आहे. २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना सेहवाग २८४ धावांवर नाबाद होता, मात्र दुसऱ्या दिवशी तो त्रिशतकापासून हुकला (२९३ धावांवर बाद).
सेहवागची कामगिरी -
१००४ टेस्ट- 8586 रन (82.23 स्ट्राइक रेट)
२५१ वनडे- 8273 रन (104.33 स्ट्राइक रेट)
१९ टी20- 394 रन (145.38 स्ट्राइक रेट)