Join us  

Virender Sehwag : विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप

Would you have removed Jasprit Bumrah as well? दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावर टीका होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:01 AM

Open in App

India vs England, ODI : भारतीय संघानं पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ६६ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या ५ बाद ३१७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी १३५ धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावर टीका होताना दिसत आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं संघ निवडीच्या निर्णायवरून विराटवर गंभीर आरोप केले. संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा आरोपही सेहवागनं केला. सातत्यानं अपयशी ठरूनही लोकेश राहुल ( KL Rahul) याला संधी मिळते, तर दुसरीकडे युझवेंद्र चहलला ( Yuzvendra Chahal) १-२ सामन्यांतील खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसवले जाते, यावरून वीरू चांगलाच भडकला. (  Virender Sehwag accuses Team India of being partial in selection matters)  कृणाल पांड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पदार्पणात १४ भारतीय खेळाडूंनी केल्या ५०+ धावा, पण लोकेश राहुल ठरला सरस

क्रिकबजशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला,''गोलंदाजाला एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे संघाबाहेर केले जाते, तेच फलंदाज लोकेश राहुलला चारवेळा संधी दिली जाते. गोलंदाजांनाही काही सामन्यातील खराब कामगिरीनंतरही संधी मिळायला हवी. युझवेंद्रच्या जागी जसप्रीत बुमराह असता आणि चार सामन्यांत त्याला चांगली कामगिरी करता आली नसती, तर त्याला संघाबाहेर केलं असतं का?, अजिबात नाही. तेव्हा तुम्ही म्हणाला असता की तो चांगला गोलंदाज आहे आणि तो पुनरागमन करेल.'' पहिल्या वन डेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिक पांड्याची मन जिंकणारी पोस्ट!

युझवेंद्र चहलला पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यांत संधी मिळाली. यापैकी दोन सामन्यांत त्यानं ४०हून अधिक धावा दिल्या, तर एका सामन्यात ३४ धावा दिल्या. त्यानं तीन सामन्यांत फक्त तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याला उर्वरित दोन ट्वेंटी-२०तून वगळण्यात आलं आणि पहिल्या वन डेतही खेळवलं नाही. पहिल्या वन डेत त्याच्या जागी कुलदीप यादवला खेळवले गेले. तेच दुसरीकडे ट्वेंटी-२० मालिकेत चार सामन्यांत फक्त १५ ( १, ०, ० व १४) धावा करणाऱ्या लोकेश राहुलला पहिल्या वन डेत खेळवण्यात आले. त्यानं ४३ चेंडूंत नाबाद ६२ धावा केल्या.  टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविरेंद्र सेहवागविराट कोहलीलोकेश राहुलयुजवेंद्र चहलजसप्रित बुमराह