अनुष्का हार घालणार तोच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरुष्का'च्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल

इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती विराट आणि अनुष्का लग्नाच्या बोहल्यावर चढले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा एक खास व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 15:03 IST2017-12-12T07:52:33+5:302017-12-12T15:03:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Viratka's wedding video Viral | अनुष्का हार घालणार तोच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरुष्का'च्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल

अनुष्का हार घालणार तोच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरुष्का'च्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल

मुंबई - आमच्या आयुष्याची ही सुंदर सुरुवात असं सांगत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली विवाहबंधनात अडकले आहे. इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती विराट आणि अनुष्का लग्नाच्या बोहल्यावर चढले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा एक खास व्हिडिओही व्हायरल झाला आहे. जेव्हा अनुष्का विराटच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा विराटचे मित्र त्याला उचलून घेतात अशा धमाल मस्तीही व्हिडिओतून पाहण्यास मिळत आहे. 


ट्विट करत विरुष्कानं आपला विवाह झाल्याचे घोषित केले. त्यानंतर सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली. विराट अनुष्काच्या लग्नातील काही फोटो या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या छायाचित्रांमधील विराट आणि अनुष्काचा लूक अगदी दृष्ट लागण्यासारखा आहे. आगामी काळात दोघांच्या चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या लूकच्याबाबत कॉपी केले तर आश्चर्य वाटायला नको.  


विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या वेळचा पेहरावही अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. विवाह सोहळ्याच्या विधींसाठी या दोघांनीही हलक्या पण, तितक्याच मोहक रंगाची रंगसंगती असणारा पारंपरिक आणि मॉडर्न टच असणारा पोषाख घातला होता. ऑफ व्हाईट रंगाच्या लेहंग्यामध्ये अनुष्का अगदी सुरेख दिसत होती. फ्लॉरल डिझाईन आणि त्याला साजेशा दागिन्यांमुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले होते. माथापट्टी, मांगटिका, लाल रंगाचा चुडा, नथनी या गोष्टींमुळे तिचा लूक अधिक उठावदार दिसत होता. तर विराटही तिच्या पत्नीच्या लेहंग्याला साजेशा रंगसंगतीतील शेरवानी आणि फेट्यात अस्सल ‘पंजाबी दुल्हा’ वाटत होता. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने या दोघांच्याही कपड्यांचे डिझाईन केल्याचे म्हटले जाते आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे अखेर शुभमंगल संपन्न झाले. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत 21 तारखेला होणार असून अनुष्का आणि विराटच्या मित्र मैत्रिणीसाठी 26 तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत. 

हळदी कार्यक्रमाचा व्हिडिओ - 


रिंग सेरेमनी व्हिडिओ - 



 

 

Web Title: Viratka's wedding video Viral