Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...

किंग कोहली तब्बल १५ वर्षांनी या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे, पण चाहत्यांचा हिरमोड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:50 IST2025-12-23T15:49:51+5:302025-12-23T15:50:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli's Vijay HazareTrophy Clash At M Chinnaswamy Unlikely To Be Open For Fans Reports | Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...

Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...

भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहली तब्बल १५ वर्षांनी देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीनं शेवटचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामना २०१० मध्ये खेळला होता. BCCI च्या नव्या नियमानुसार, कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात विराट कोहलीली पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटकडे वळावे लागत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विराटसह अनेक स्टार Vijay Hazare Trophy स्पर्धेत खेळताना दिसणार

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेला २४ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक स्टार या स्पर्धेत खेळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या स्पर्धेची उत्सुकता कमालीची वाढली आहे. पण विराटच्या चाहत्यांना हिरमोड करणारी बातमी समोर येत आहे.  विराट मैदानात उतरणार असला तरी चाहत्यांना किंग कोहली खेळत असणारा सामना स्टेडियमवर जाऊन पाहता येणार नाही.  इथं जाणून घेऊयात काय आहे त्यामागचं कारण त्यासंदर्भातील सविस्तर बातमी 

Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?

किंग कोहली मैदानात उतरणार; पण चाहत्यांचा हिरमोड  

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहली हा दिल्लीच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. दिल्लीचे सामना हे बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. पण सुरक्षिततेच्या कारणास्तवर बंगळुरुच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे विराट चाहत्यांची घोर निराशा होणार आहे.

कर्नाटक सरकारचा निर्णय

जी माहिती समोर येत आहे त्यानुसार, कर्नाटक सरकार कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला (KSCA) चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफीचे सामने प्रेक्षकांशिवाय घेण्याचे निर्देश देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, KSCA ने चाहत्यांसाठी दोन स्टँड उघडण्याचा पर्याय विचारात घेतला होता, ज्यामुळे सुमारे २,००० ते ३,००० प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकला असता. मात्र, राज्य प्रशासनाने या प्रस्तावाला विरोध केला आहे.

बंगळुरुच्या मैदानात घडली होती दुर्दैवी घटना

खरं तर, IPL 2025 च्या अंतिम सामन्यानंतर ४ जून रोजी याच स्टेडियममध्ये आरसीबी संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या स्टेडियममधील सामन्यांवर निर्बंध घालण्यात आले.
 चिन्नास्वामी स्टेडियम शहराच्या मध्यभागी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होतात, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. याच कारणामुळे स्टेडियमवर सामना होणार असला तरी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.

Web Title : विजय हजारे ट्रॉफी: कोहली की वापसी, लेकिन दर्शकों को अनुमति नहीं; जानिए क्यों

Web Summary : विराट कोहली 15 साल बाद विजय हजारे ट्रॉफी में वापसी कर रहे हैं। कोहली और अन्य सितारों के खेलने के बावजूद, स्टेडियम में पिछली त्रासदी के बाद सुरक्षा चिंताओं के कारण बेंगलुरु के मैचों में दर्शकों को अनुमति नहीं है।

Web Title : Vijay Hazare Trophy: Kohli Returns, But No Fans Allowed; Here's Why

Web Summary : Virat Kohli returns to Vijay Hazare Trophy after 15 years. Despite Kohli and other stars playing, fans are barred from Bengaluru's matches due to security concerns following a past tragedy at the stadium.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.