Join us

Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  आयपीएल २०२४ मध्ये सलग तीन सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 15:54 IST

Open in App

IPL2024, RCB vs GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  आयपीएल २०२४ मध्ये सलग तीन सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. RCB ने उशीरा का होईना, पण विजयाची लय पकडलेली दिसतेय. गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांनी अप्रतिम खेळ दाखवला. प्रथम गोलंदाजांनी GT चा संपूर्ण संघ १४७ धावांत उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर RCBने केवळ १३.४ षटकांत ६ गडी बाद १५२ धावा करून विजय मिळवला.  

विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिसने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी केवळ ५.५ षटकांत ९२ धावा केल्या. ड्यू प्लेसिस २३ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार व ३ षटकार खेचले. यानंतर आरसीबीने २५ धावांत ६ विकेट्स गमावल्या. विराट २७ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. विराटने २ चौकार आणि ४ षटकार मारले. विराटशिवाय दिनेश कार्तिकने १२ चेंडूत २१ धावा आणि स्वप्नील सिंगने ९ चेंडूत १५ धावा करत संघाला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पण मॅचमध्ये असं काही घडलं की विराटच्या तोंडून शिव्या निघाल्या.

बंगळुरूच्या डावातील ७ वे षटक संपले असताना २ गडी गमावून १०० धावा केल्या होत्या. रजत पाटीदार आणि विराट कोहली क्रीजवर होते. संघाला विजयासाठी ७८ चेंडूत ४८ धावा करायच्या होत्या. दरम्यान, यष्टिरक्षक वृद्धिमान साहा GT च्या सहकाऱ्यांना धावा थांबवा आणि सामन्यात पुनरागमन करा, असे प्रोत्साहन देत होता. तितक्यात विराटने नेहमीच्या शैलीत, बेन%%&&, अशा कशा धावा रोखणार... असे म्हटले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्सविराट कोहलीवृद्धिमान साहाऑफ द फिल्ड