Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम, रहाणे, पुजारा यांची घसरण

भारतीय कर्णधार विराट कोहली याने बुधवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 03:54 IST

Open in App

दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली याने बुधवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. त्याचवेळी, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची मात्र घसरण झाली.आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार कोहली ९२८ गुणांसह अव्वल, तर आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पुजारा ७९१ गुणांसह सहाव्या आणि रहाणे ७५९ गुणांसह नवव्या स्थानी घसरला. दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ७७२ आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ७७१ गुणांसह अनुक्रमे नवव्या तसेच दहाव्या स्थानावर आहेत. आॅस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याने कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट तिसºया स्थानी झेप घेतली. २५ वर्षांच्या या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्ध अंतिम कसोटीत २१५ आणि ५९ धावा केल्या होत्या. त्याने मालिकेत सर्वाधिक ५४९ धावा केल्या आहेत.आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. नील वॅगनर ८५२ आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ८३० गुणांसह दुसºया आणि तिसºया स्थानावर आले. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट पाचव्या स्थानी झेप घेतली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध १५ गडी बाद केले. फिरकीपटू नॅथन लियोन याने दहा गडी बाद केल्यामुळे तो आता १४ व्या स्थानावर आला. (वृत्तसंस्था)>स्टोक्स अव्वल दहामध्येन्यूझीलंडसाठी अष्टपैलू कामगिरी करणारा कॉलिन डी ग्रँडहोमे हा फलंदाजांच्या यादीत ४७ वरुन ३९ व्या आणि गोलंदाजांच्या यादीत ३६ वरुन ३४ व्या स्थानावर आला. इंग्लंडचा बेन स्टोक्स याने ४७ आणि ७२ धावांची खेळी करीत दुसऱ्यांदा अव्वल दहा फलंदाजात स्थान पटकावले. डॉम सिबले पहिल्या कसोटी शतकाच्या बळावर८० व्या स्थानावर आला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन २८ व्यांदा पाच गडी बाद करीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल दहा खेळाडूत दाखल झाला आहे.