Join us

विराटसेनेने मिळवला ऐतिहासिक विजय आणि निवड समिती झाली मालामाल

भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, पण आता मालामाल झाले आहे ती निवड समिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 21:57 IST

Open in App

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेतही भारताने विजय मिळवले. भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, पण आता मालामाल झाले आहे ती निवड समिती. कारण बीसीसीआयने निवड समितीला आता खास रोख पारितोषिक दिले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवल्यावर भारतीय संघ आता न्यूझीलंडला रवाना झाला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत बुधवारी नेपीयर येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाजांमधील एका स्थानासाठी मोहम्मद खलील व शंकर यांच्यात टॉस करावा लागणार आहे. अॅडलेड वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावांची मेजवानी देणाऱ्या मोहम्मद सिराजचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. फलंदाजीत अंबाती रायुडूला संधी मिळणे अवघड आहे. त्याच्याजागी जाधव पहिल्या सामन्यात खेळू शकतो. 

बीसीसीआयने निवड समितीच्या पाचही सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीमुळे निवड समिती सदस्य चांगलेच मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :बीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया