Join us

दहा हजार धावांनंतर विराट कोहलीची बीसीसीआयसाठी खास मुलाखत, पाहा व्हिडीओ...

विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला. या पराक्रमानंतर कोहलीने बीसीसीआयला एक खास मुलाखत दिली. त्यामध्ये कोहलीने आपले मनोगत व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:01 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत कोहलीने सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहलीने काल दहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये प्रवेश केला. विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला. या पराक्रमानंतर कोहलीने बीसीसीआयला एक खास मुलाखत दिली. त्यामध्ये कोहलीने आपले मनोगत व्यक्त केले.

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत कोहलीने सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. सचिनला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी २५९ धावांत फलंदाजी करावी लागली होती, पण कोहलीने २०५ डावांत दहा हजार धावांचा पल्ला गाठला आहे.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध वेस्ट इंडिज