Join us

कॅप्टन कोहलीचं ड्रीम होम, असा दिसतो विराटच्या नव्या घरातून मुंबईचा नजारा

घरातून समुद्राच्या नयनरम्य दृश्याचा सुंदर फोटो विराटने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:01 IST

Open in App

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये धावांचा डोंगर रचणाऱ्या विराटला सध्याच्या श्रीलंकेतील मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. सुट्टीवर असलेल्या विराटचे प्रत्येक अपडेट्स त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर विराट व अनुष्का मुंबईतील नव्या घरी शिफ्ट झाले. विराट व अनुष्काचं हे अलिशान घर कसं असणार ? याबद्दलची सगळ्यांनाच उत्सुकता होती. चाहत्यांची ही उत्सुकता कॅप्टन कोहली थोडी कमी केली आहे. विराटने गुरुवारी पहिल्यांदाच त्याच्या मुंबईतील नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली.मुंबईतील बड्या इमारतीमध्ये असलेल्या घरातून समुद्राच्या नयनरम्य दृश्याचा सुंदर फोटो विराटने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. विराटच्या घरातून दिसणारी मुंबई चाहत्यांनाही चांगलीच आवडली आहे. 

 

घरातून एवढा सुंदर व्ह्यू दिसत असताना व्यक्ती कुठे जाऊ शकतो, असं कॅप्शन विराटने फोटो शेअर करताना दिलं आहे. मुंबईच्या वरळीतील समुद्रकिनारी असणारं विराट व अनुष्काचं नवं घर तब्बल 7,171 चौरस फुटांचं आहे. विराटने  2016 मध्ये 34 कोटी रुपयांमध्ये हे घर खरेदी केलं होतं. काही दिवसांपूर्वी विराटने नव्या घरात कॉफी पितानाचा फोटो शेअर केला होता. "स्वत:च्या घरातील कॉफीची चव आणखी उत्तम असते," असं कॅप्शन त्याने हा फोटो शेअर करताना दिलं होतं.

अभिनेत्री अनुष्का शर्मा व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यानंतर दिल्ली व मुंबईमध्ये शानदार रिसेप्शनही दिलं. यानंतर हे दोघेही मुंबईतील नव्या घरी शिफ्ट झाले.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा