मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचे वृत्त अनुष्का शर्माच्या माध्यम प्रतिनिधीनी फेटाळले आहे. विराट आणि ९ ते १२ डिसेंबरदरम्यान इटलीतील मिलान येथे चालणाऱ्या सोहळ्यात विवाहबद्ध होतील, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या महिन्यात विवाहबद्ध होत असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते. त्यानंतर ही खबर झपाट्याने प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. मात्र आता अनुष्काच्या पीआरने सर्वांसमोर येत हे वृत्त बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. "विराट आणि अनुष्काच्या विवाहाचे वृत्त निराधार आहे. सदर वृत्तवाहिनी अनुष्का इलटीला रवाना झाल्याचे सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात अनुष्का बीकेसीमध्ये असून, तेथे ब्रँड मिटिंगमध्ये सहभागी झाली आहे." मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लवकरच शुभमंगल होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. येत्या आठवड्यात दोघेही लग्न करणार असल्याचे सदर वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले होते. मात्र, विराट आणि अनुष्काकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेली कसोटी मालिका आजच संपली असून येत्या 10 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अति क्रिकेट आणि रोटेशन पॉलिसीमुळे विराट कोहलीला विश्रांती दिल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र लग्नासाठीच विराटला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याची चर्चा होती. विराट-अनुष्काची ब्युटीफुल लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट कोहलीच्या विवाहाचे वृत्त निराधार, अनुष्काच्या पीआरने केले स्पष्ट
विराट कोहलीच्या विवाहाचे वृत्त निराधार, अनुष्काच्या पीआरने केले स्पष्ट
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचे वृत्त अनुष्का शर्माच्या माध्यम प्रतिनिधीनी फेटाळले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 13:11 IST