Join us  

'विराट कोहलीच्या फलंदाजीने केले मंत्रमुग्ध'

विराटची फलंदाजी पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:58 PM

Open in App

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...क्रिकेट सामने पावसात वाहून जाणे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी वाईट घटना असते. विशेषत: युवा खेळाडूंची घोर निराशा होते. धर्मशाळा येथे पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्यानंतर मोहालीत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे खेळाडू आनंदी होते. बदलातून जात असलेल्या द. आफ्रिका संघाला मात्र लय जाणवली नाही. भारताने मात्र विजयासहशानदार सुरुवात केली.

बदलाचा काळ येईल तेव्हा वरिष्ठांकडे पाहूनच युवा खेळाडूंना प्रेरणा लाभते. क्विंटन डिकॉक याने स्वत: नैसर्गिक खेळ करीत कर्णधारपदाची योग्य जबाबदारी निभावली. डेव्हिड मिल्लर मात्र अपयशी ठरला. किंग्स इलेव्हनकडून आयपीएल सामने खेळणारा मिल्लर मोहालीतील स्थितीचा चांगला लाभ घेऊ शकतो, अशी अपेक्षा होती. फलंदाजीत त्याला यश आले असते तर १७० च्या जवळपास धावा झाल्या असत्या. दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे यश मात्र नजरेआड करता येणार नाही. चाहरने नव्या आणि जुन्या चेंडूने कमालीचा मारा केला. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने बुवामाला अलगद जाळ्यात ओढले. सुंदर चेंडूला अधिक वळण देऊ शकत नाही पण उंचपुºया काठीचा हा गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजाला घाम फोडतो. माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय वरिष्ठ खेळाडू सकारात्मक फटकेबाजी करीत होते. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा आक्रमकपणा पाहण्यासारखा होता. मालिकेआधीच संघ व्यवस्थापनाने दोघांना मनसोक्त फटकेबाजीची मोकळीक दिली असावी. 

विराटची फलंदाजी पाहून डोळ्याचे पारणे फिटले. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने फारच सहजतेने फटके मारले. वेगवान गोलंदाजांविरुद्ध तो फूटवर्कचा वापर फारच शिताफीने करतो. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरवरुन मारलेला फटका फारच सुरेख होता. रबाडाच्या चेंडूवर त्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने फ्लिक शॉट खेळला तोही अप्रतिमच होता. मनगटाला वळण देत विराट स्क्वेअर लेगवर फटका मारतो तेव्हा त्याचे स्वत:वर किती नियंत्रण आहे, याची जाणीव होते.संघाची खरी ताकद कळते ती मालिका पुढे सरकल्यानंतर. मोहालीत पराभव पत्करणाºया द. आफ्रिका संघाला रविवारी बेंगळुरु येथे विजयासह पुनरागमन करण्यात यश येते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका