Join us

विराट कोहलीचे हे चॅलेंज शिखर धवनने केले पूर्ण

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन, हे दोघेही दिल्लीचे. त्यांच्यामध्ये खास मैत्रीचे नाते आहे. त्यामुळे कोहलीने धवनला एक चॅलेंज दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 18:17 IST

Open in App
ठळक मुद्देकोहलीने धवनला स्वॅग पॅक चॅलेंज दिले होते. या चॅलेंजनुसार पाठीवर टुरीस्ट बॅग घेऊन डान्सचे काही प्रकार करायचे असतात.

नवी दिल्ली : भारतीय संघातील स्थान टिकवणे, हे सर्वात मोठे चॅलेंज. पण  संघातील खेळाडूंमध्ये जर वातावरण खेळीमेळीचं असेल तर कामगिरीही चांगली व्हायला मदत होते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन, हे दोघेही दिल्लीचे. त्यांच्यामध्ये खास मैत्रीचे नाते आहे. त्यामुळे कोहलीने धवनला एक चॅलेंज दिले होते आणि धवनने ते पूर्णही केले आहे.

श्रीलंकेमध्ये सध्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेतून कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण तरीही त्याने धवनला एक चॅलेंज दिले होते. धवन हे पूर्ण करणार नाही, असे कोहलीला वाटत होते. पण सध्या फार्मात असलेल्या धवनने या मैदानातही बाजी मारली आहे.

कोहलीने धवनला स्वॅग पॅक चॅलेंज दिले होते. या चॅलेंजनुसार पाठीवर टुरीस्ट बॅग घेऊन डान्सचे काही प्रकार करायचे असतात. धवन आणि डान्सचा काही संबंध नाही, असा विचार करून कोहलीने धवनला हे चॅलेंज दिले होते. पण धवन यामध्येही बाजी मारली आहे.

गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ट्वेन्टी-20 सामना खेळवला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धवनने अर्धशतक झळकावले होते, पण भारत पराभूत झाला होता. बांगलादेशविरुद्धच्या लढतीतही धवनने अर्धशतक झळकावले आणि भारताने या सामन्यात विजय मिळवला. सामना आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी धवनने थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर त्याने धवनने दिलेले चॅलेंज पूर्ण केले. धवनने आपल्या पाठीवर एक टुरीस्ट बॅग घेतली आणि त्यानंतर डान्स केला. हा आपला व्हीडीओ विराटला पाठवला आहे.

टॅग्स :विराट कोहलीनिदाहास ट्रॉफी २०१८शिखर धवन